मनसेच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज माघारी

  Andheri
  मनसेच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज माघारी
  मुंबई  -  

  वर्सोवा - मतदार संघातील प्रभाग क्रमांक 60 मधून मनसेकडून प्रशांत राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षात उमेदवारी न मिळाल्यामुळे मनसे उपविभाग अध्यक्ष सचिन गाडे यांनी बंडखोरी करत याच वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावर तोडगा म्हणून मनसे सचिव प्रमोद पाटील यांनी दोघांची भेट घेतली. प्रमोद पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी सचिन गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई, अंधेरी विधानसभेचे मनीष धुरी, त्रिपुरा नायर यांच्या उपस्थितीत सचिन गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.