Advertisement

डोंबिवलीच्या रस्त्यावरून एक फेरफटका मारून दाखवा, मनसेच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

स्थानिक प्रशासनाकडे दाद मागूनही रस्त्यांची अवस्था सुधरत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच डोंबिवलीतील रस्त्यावरून फेरफटका मारून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे.

डोंबिवलीच्या रस्त्यावरून एक फेरफटका मारून दाखवा, मनसेच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
SHARES

पावसामुळे केवळ मुंबईच नाही, तर ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडे दाद मागूनही रस्त्यांची अवस्था सुधरत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच डोंबिवलीतील रस्त्यावरून फेरफटका मारून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. (mns mla raju patil criticised on cm uddhav thackeray over potholes on kalyan shil road)   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना सत्तेत असल्याने राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

हेही वाचा - लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलंय, राजू पाटील यांची टीका

कल्याण-शीळ रोड हा येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जातो. दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. प्रामुख्याने ठाणे ते डोंबिवली-कल्याण या शहरांमधील रहिवासी या मार्गाचा मोठा प्रमाणात वापर करतात.  सध्या रेल्वे सेवा बंद असल्यामुळे तर कल्याण-शीळ मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढली आहे. त्यातच या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखं आहे. 

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन गेले असता, ते ज्या ठिकाणी वाहनाने जाणार आहेत, त्या भागातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही रस्त्यांची डागडुजी होत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतपण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा