Advertisement

राज शनिवारी कुणावर करणार 'सर्जिकल स्ट्राईक'?

येत्या ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३ वा वर्धापन दिन आहे. याच दिवशी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करतील. याच सभेची माहिती देण्यासाठी मुंबईत जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

राज शनिवारी कुणावर करणार 'सर्जिकल स्ट्राईक'?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ मार्चला ''राजकीय सर्जिकल स्ट्राईक'' अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईभर लावलेत. तसंच ''सर्जिकल स्ट्राईक''साठी तयार राहण्याचं आवाहनही मनसैनिकांना पक्षाकडून करण्यात आलं आहे. या पोस्टर्समुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुणाला टार्गेट करणार? अन् कुणाची दाणादाण उडवणार याची उत्सुकता ताणली गेलीय.


वर्धापन दिनाचा मुहूर्त

येत्या ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३ वा वर्धापन दिन आहे. याच दिवशी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करतील. याच सभेची माहिती देण्यासाठी मुंबईत जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या सभेत राज पक्षासाठी काय स्ट्रॅटर्जी आखतील, याचीही कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. 


पक्षांची मोर्चेबांधणी 

या महिन्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून पक्षातील गटबाजीलाही उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सहभागी होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.


वैचारिक मतभेत

मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा मतांची विभागणी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. परंतु, यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मनसेशी वैचारिक मतभेद असल्याचे सांगत त्यांना महाआघाडीत घेणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाआघाडीची दारे सर्वांसाठी खुले असल्याचे सांगत मनसेला सोबत घेण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. त्यामुळे आता मनसेबाबत काय निर्णय होतोय हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.



हेही वाचा - 

मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात एल्गार पुकारणार ?

चंदा कोचर यांची ११ तास ईडीकडून चौकशी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा