Advertisement

मोर्चाला पोलिसांचा नकार तरीही मोर्चा काढणार; मनसे कार्यकर्ते ठाम

गुरूवारी संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

मोर्चाला पोलिसांचा नकार तरीही मोर्चा काढणार; मनसे कार्यकर्ते ठाम
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकाडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या काळात घरी बसलेल्या नागरिकांना विविध स्वरुपात आर्थिक संकटांचा सामाना करावा लागला. यामध्ये महत्वाचं म्हणजे 'वीज बिल'. मागील काही महिन्यांपासून नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेचं बिल येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळं आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं हे वीज बिल भरायचं कसं? असा प्रश्न सामान्यांना सातावत आहे. त्यामुळं या सामान्यनागरिकांना दिलासा देण्यासाठी व त्यांची आर्थिक अडचण दुर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, गुरूवारी संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

वाढीव वीज बिलविरोधात सर्वात मोठा मोर्चा हा मुंबईत नियोजित करण्यात आला आहे. परंतु, या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं समजतं. मुंबईतील म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार होता. या मोर्चासाठी मनसेनं परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळं सुरक्षेचं कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. पण पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र सैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. राजयोग हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा निघणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. शिवाय, वीज बिलविरोधात निघणारा मोर्चा अतिशय शांतपणे निघेल, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. मोर्चाबाबत राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्चात सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन व्हावं, अशी सूचना देण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा