Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर
SHARES

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मंगळवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या आवडत्या 'जेम्स' या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचं निधन झालं आहे. राज ठाकरे कुटुंबियांकडे आता ही विविध प्रजातींची ६ पाळीव श्वान आहेत. यातील 'जेम्स' या श्वानाचं निधन झालं आहे.

राज ठाकरे यांच्या घरी विविध प्रजातींची पाळीव श्वानी अनेक वर्षापासून आहेत. यातील राज ठाकरे यांच्या आवडत्या जेम्स या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झालं आहे. राज ठाकरे यांच्याकडे ३ ग्रेट डेन जातीचे कुत्रे होते यातील बॉण्ड आणि श्वानचं आधीच निधन झालं आहे आता 'जेम्स' या कुत्र्याचं निधन झालं आहे.

२६ डिसेंबर २०१८ रोजी राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून राज ठाकरेंसोबत असलेल्या 'बॉण्ड'चं निधन झालं. राज ठाकरे यांनी स्वतः त्यावेळी बॉण्डला परळच्या स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला आहे. बॉण्ड याच कुत्र्याने राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना चावा घेतला होता. यानंतर त्याची रवानगी राज ठाकरे यांच्या कर्जत फार्महाऊसवर करण्यात आली होती. 



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा