प्रार्थनास्थळ वाचविण्यासाठी मनसे-शिवसेना एकत्र

 Dhobi Ghat
प्रार्थनास्थळ वाचविण्यासाठी मनसे-शिवसेना एकत्र
प्रार्थनास्थळ वाचविण्यासाठी मनसे-शिवसेना एकत्र
प्रार्थनास्थळ वाचविण्यासाठी मनसे-शिवसेना एकत्र
See all

सातरस्ता - चिंचपोकळी येथील एका अनधिकृत प्रार्थना स्थळावर जी दक्षिण पालिका विभागाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. हे प्रार्थनास्थळ पदपथावर असल्यामुळे यावर पालिकेने कारवाई केली. मात्र या स्थळावर होणाऱ्या पालिकेच्या कारवाईला स्थानिकांनी कडकडून विरोध केला. यावेळी या विभागातील सर्व स्थानिकांनी आणि पक्षांनी एकजूट दाखवली. यावेळी मनसे शाखाध्यक्ष मारुती दळवी आणि शिवसेना शाखाप्रमुख राजेश कुसळे, गोपाळ खाडे उपस्थित होते. गेली 50 वर्ष हे प्रार्थना स्थळ आहे. दरम्यान याआधी पालिका प्रशासन झोपलं होत का? असा सवाल मनसे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी उपस्थित केला. तर यावर बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असे शिवसेना शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितले.

Loading Comments