आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जय्यत तयारी केली आहे. मनसेची राज्यस्तरीय बैठक मंगळवार १२ जानेवारीला वांद्रेतील एमआयजी क्लब इथं सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीचे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत कृष्णकुंज येथे बैठकांचे सत्र सुरु केले आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द
MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता