संजय मांजरेकरांची मनसेवर टीका

  Pali Hill
  संजय मांजरेकरांची मनसेवर टीका
  मुंबई  -  

  मुंबई - लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय चित्रपटात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदीसाठी आक्रमक झाली आहे. करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकीस्तानी कलाकार असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नेण्याची धमकी मनसेनं दिली. माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी मनसेच्या या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतलायं. 'एक आमदार असलेल्या पक्षानं काही धडा घेतलेला दिसत नाही', 'सातत्याने अशा धमक्या देणारा हा पक्ष पुढील निवडणुकीत ‘झिरो एमएलए पार्टी’ होईल', असा टोला ट्विट करून मांजरेकर यांनी मनसेला लगावलाय. संजय मांजरेकर यांनी अचानक ही भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मांजरेकरांच्या या ट्विटवर मनसेची काय प्रतिक्रिया येते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.