Advertisement

जुन्या नोटा कालबाह्य, एटीएमच्या बाहेर गर्दी


SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यानंतर संपूर्ण मुंबईत एटीएमच्या बाहेर, पेट्रोल पंपाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरु शकता. हॉस्पिटल, पेट्रोलपंप, रेल्वे तिकीट काऊंटर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मशानभूमी, बस तिकीट अशा अनेक ठिकाणी जुन्या नोटा घेतल्या जातील. तर 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बदलता येतील. नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र घेऊन जाणं अनिर्वाय आहे. घोषणा पत्राबरोबर 31 मार्च 2017 पर्यंत या सर्व नोटा आरबीआय बँकेत जमा केल्या जातील. 10 ते 24 नोव्हेंबरपर्यंत फक्त 4000 रुपये जमा केले जातील. तर 18 नोव्हेंबरपर्यंत दिवसातून दोन वेळा फक्त 2000 रुपये काढता येतील. 19 नोव्हेंबर नंतर एटीएम किंवा बँकेतून 4000 रुपये काढता येतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा