Advertisement

भाजपच्या भीतीनेच दोन दिवसांचं अधिवेशन, फडणवीसांचा सरकारला टोला

कोविडमध्ये उत्तम काम केलं अशी पाठ थोपटली जाते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

भाजपच्या भीतीनेच दोन दिवसांचं अधिवेशन, फडणवीसांचा सरकारला टोला
SHARES

महाराष्ट्राची आजची परिस्थिती जी आहे, त्याला सरकार म्हणता येईल का?, असा प्रश्न उपस्थित करत सरकारमधील मंत्री झाले एकेक विभागाचे राजे अन् प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी अवस्था असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे.

मुंबई इथं आयोजित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोप सत्राला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

वाझे प्रकरणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सरकारने विधिमंडळ बंद केलं. या सरकारने भलेही लोकशाहीची दारं बंद करून टाकली असतील, पण लोकशाही पुनर्स्थापित कशी करायची हे आम्हाला ठावूक आहे. विविध विभागातील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचं ठेवण्यात आल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मृत्यूच्या सापळ्याचं माॅडेल

कोरोनाच्या स्थितीवरून सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, कोविडमध्ये उत्तम काम केलं अशी पाठ थोपटली जाते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्या अनुषंगाने हे तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल बनलं आहे.

हेही वाचा- ‘त्या’ प्रत्येक जागेवर ओबीसी उमेदवार, भाजपचा निर्णय

मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे महाराष्ट्रात आहे का? असा प्रश्न निर्माण करणारे यांचं काम आहे! एकतरी जंबो कोविड सेंटर मुंबईच्या बाहेर उघडलं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

आरक्षण टिकवता आलं नाही

केवळ आणि केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालं. केंद्राकडे डेटाची मागणी ही ५० टक्क्यांच्या वरचं आरक्षण टिकविण्यासाठी. पण महाविकास आघाडी सरकारला ५० टक्क्याच्या खालचं आरक्षण टिकवता आलं नाही. 

१५ महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिलं. त्यामुळे ५० टक्क्याच्या आतलं सुद्धा ओबीसी आरक्षण रद्द होण्याचं पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचं आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

(most covid 19 death in maharashtra is not admirable says devendra fadnavis)

हेही वाचा- महापालिकेची तिजोरी कोण कुरतडतंय?, आशिष शेलारांचा संतप्त सवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा