Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण
SHARES

राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान खरेदी खरेदीप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत व संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली अाहे. याप्रकरणी काँग्रेसतर्फे २७ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


मित्रांसाठी चालवताहेत देश

मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिद्ध झालं आहे. देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलली, हे स्पष्ट झाले आहे.


अनिल अंबानींचा केला फायदा

काँग्रेस सरकारनं एका राफेल विमानाची किंमत ५२६.१० कोटी रुपये निश्चित केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींना सोबत घेऊन फ्रान्सला गेले व जुनी डील रद्द करून प्रति राफेल विमान १६७०.७ कोटी किंमतींना खरेदी केले. या नव्या डीलमध्ये ४१ हजार २०५ कोटी रूपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या १०-१२ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला ३० हजार कोटींचे ऑफसेट कंत्राट व १ लाख कोटींचे लाईफ सायकल कंत्राट दिले गेले. राफेल खरेदी व्यवहारात देशातील जनतेचे १ लाख ३० हजार कोटी रुपये मोदींनी अनिल अंबानींच्या कंपनीला दिले आहेत, हा महाघोटाळा आहे, असे चव्हाण म्हणाले.


हेही वाचा -

सरकार साधतंय उद्योगपतींचं हित, 'आप' ची सरकारवर टीका

मुख्यमंत्री तपासणार मंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा