Advertisement

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींची उत्तर मुंबईत १५० किमीची पदयात्रा

भाजपच्या प्रत्येक खासदारानं १५० किलोमीटरची पदयात्रा काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला अनुसरून उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींची उत्तर मुंबईत १५० किमीची पदयात्रा
SHARES

सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक खासदारानं १५० किलोमीटरची पदयात्रा काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला  अनुसरून उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पदयात्रेला प्रारंभ केला आहे. 'यंदाचं वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष असून ही १५० किमीची पदयात्रा म्हणजे त्यांना आमची आदरांजली आहे', असं खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

१० किमीचा टप्पा

'भाजप सरकारनं काश्मीरबाबतचं कलम ३७० रद्द केल्यानं देशात चैतन्याची लाट उसळली आहे. देशाविषयीचा स्वाभिमान अगदी सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण व्हावा, सरकारी योजनांची-उपक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ आॅगस्ट रोजी या पदयात्रेचा पहिला १० किमीचा टप्पा आम्ही बोरिवली विधानसभेत पूर्ण केला. सोमवारी या दुसऱ्या  पदयात्रेचा दुसरा टप्पा असून, असंख्य नागरिक पदयात्रेत सहभागी झाले', असं खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं.

१५० किमीची पदयात्रा

दहिसरमधील पदयात्रेत आमदार मनीषाताई चौधरी,  जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, मुंबई उपाध्यक्ष श्रीकांत पांडे, करूणाशंकर ओझा आदी मान्यवर आणि अनेक नागरिक सहभागी घेतला होता. 'येत्या ३ आठवड्यात उत्तर मुंबईतील १५० किमीची पदयात्रा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं.



हेही वाचा -

अमिताभकडून पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं- मनोहर जोशी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा