मतदान जनजागृतीसाठी पोलिसांचा फ्लॅग मार्च

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणूक काही तासांवर येऊन ठेपलीय. या पार्श्वभूमीवर मुलुंड पोलिसांनी फ्लॅग मार्च रॅलीचं आयोजन केलं होतं. कोणत्याही दबावाखाली न येता आणि शांततेत मतदान व्हावं हाच या फ्लॅग मार्च मागचा उद्देश होता.

मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावला पाहिजे यासाठी पोलिसांनीही आता पुढाकार घेतलाय. मतदानाची सुट्टी मजामस्तीसाठी न घालवता त्याचा उपयोग मतदान करण्यासाठीच करा हे लोकांना सांगण्याच्या मुख्य हेतूने पोलिसांनी ही रॅली काढली. तर, आपणही पोलिसांप्रमाणे जागृत राहून आपला हक्क बजावा असं आवाहन ‘मुंबई लाइव्ह’ तुम्हाला करत आहे.

Loading Comments