Advertisement

'हाता'नं खड्ड्यात लावलं कमळ !


'हाता'नं खड्ड्यात लावलं कमळ !
SHARES

मुंबईच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे असताना गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबईतल्या अनेक रस्त्यांची चाळण केली आहे. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मुंबईत फक्त चार हजारच खड्डे असल्याचं म्हटलं अाहे. मुख्यमंत्री मुंबईकरांची दिशाभूल करत अाहेत असं म्हणत काँग्रेसनं खड्ड्यांविरोधात गुरूवारी आगळंवेगळं आंदोलन केलं.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायन प्रतिक्षानगर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यात चक्क हातानं कमळाचं फुल लावत आंदोलन केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत हे आगळंवेगळं आंदोलन पार पडलं. तर यावेळी सरकारचा, पालिकेचा, शिवसेनेचा आणि भाजपाचा निषेध करणारं भजन गात सरकारविरोधात गोंधळही घातला.




जीवघेणे खड्डे 

मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर अाहे.  खड्ड्यात पडून अनेक अपघात होत असून हे खड्डे जीवघेणे ठरत आहे. तर पावसात खड्ड्यांचं प्रमाण प्रचंड वाढत असून मुंबईच्या रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. पण पालिका असो वा राज्य सरकार वा संबंधीत सरकारी यंत्रणा कुणीही या प्रश्नाकडं गांभीर्यानं पाहत नाही. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असून मुंबईकरांसाठी खड्डे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार, पालिका आणि संंबधित यंत्रणाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं खड्ड्यात कमळ लावण्याच्या आंदोलनाचं आयोजन केलं होतं.


खड्डे बुजवल्याचा दावा 

बोल मेरे पाॅटहोल बोल, सेना-भाजपा की आँखे खोल असं म्हणत करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरवर्षी खड्डे बुजवल्याचा दावा पालिका आणि सरकार करतं. पण प्रत्यक्षात मात्र खड्डे बजुलेले नसतात. उलट पावसाळ्यात तर मुंबईच्या रस्त्यांची चाळणच होते. त्यामुळं आता या खड्ड्यात कमळाच्या फुलाला गाडण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच आम्ही हे आंदोलन केल्याची प्रतिक्रिया यावेळी निरूपम यांनी दिली आहे.



हेही वाचा -

भिडेंच्या आंबा, मनूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका!

मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा