Advertisement

वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये मुंबईला सदस्यत्व


वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये मुंबईला सदस्यत्व
SHARES

जागतिक सांस्कृतिक मंचमध्ये (वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरम) मुंबई शहराचा समावेश सदस्य शहर म्हणून करण्यात आला आहे. या संदर्भातील कागदपत्रांवर लंडनचे महापौर सादिक खान आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. लंडनचे महापौर सादिक खान यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय पर्यटन यांच्यासह इतर विविध क्षेत्रांत मुंबई आणि लंडनमध्ये वाढत्या सहकार्याबद्दल चर्चादेखील झाली.


मुंबईला जगाच्या नकाशावर आणण्याचे ध्येय

'मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईला आर्थिक आणि तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आणण्याचं आमचं ध्येय असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेच्या अनुभवाचा फायदा मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच होईल. आखीव रेखीव अशा या शहराच्या प्रशासनाकडूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. आधुनिक तंत्रज्ञानासाठी, तसंच राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय पर्यटनाच्या वाढीसाठी लंडन शहराकडून मोलाचं सहकार्य मिळेल', असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.


मुंबई आणि लंडन ही जुळी शहरं आहेत. लंडनप्रमाणेच मुंबईसुद्धा आर्थिक, व्यापारी केंद्र आहे. लंडनमध्ये अनेक भारतीय नागरिक राहतात. तर लंडनचे उपमहापौर हे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे आपण एकमेकांचे बांधव आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्मार्ट सिटीची संकल्पना अतिशय चांगली असून यामध्ये सहकार्य करण्यास आम्हाला आनंद होईल. लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मितीसाठी असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा बॉलिवूडला होईल.

सादिक खान, महापौर, लंडन



हेही वाचा

समुद्रासह किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण करणार तयार - मुख्यमंत्री


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा