Advertisement

तर पूर्ण लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, अस्लम शेख यांची गर्दीवर नाराजी

लोकांनी नियमांचं पालन केलं नाही, तरी पूर्ण लॉकडाऊन हाच यावरचा शेवटचा पर्याय असेल, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

तर पूर्ण लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, अस्लम शेख यांची गर्दीवर नाराजी
SHARES

राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीने निर्बंध अधिक कठोर केले आहेत. तरीही काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी दिसून येत आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही, तरी पूर्ण लॉकडाऊन हाच यावरचा शेवटचा पर्याय असेल, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam sheikh) यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्लम शेख यांनी सांगितलं की, मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहेत. यामागचं एक कारण म्हणजे जनतेच्या मनात कमी झालेली कोरोनाबाबतची भीती आणि नियम पाळण्याकडे होत असलेलं दुर्लक्ष होय. कोरोनाला (coronavirus) रोखण्यासाठी नाईलाजाने पुन्हा एकदा निर्बंध कडक करावे लागले आहेत. परंतु अजूनही काही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. 

हेही वाचा- पोलीस दलाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप नसेल, नव्या गृहमंत्र्यांचं आश्वासन

नवी नियमावली लागू करून दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे नवीन नियमावली अजून काही लोकांना नीट समजलेली नसेल, प्रशासन आणि पोलीस अजूनही लोकांना हे नवे नियम समजावून सांगत आहेत. मुंबईत सध्या लोकल ट्रेन, बस, इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. सोमवार ते शुक्रवार व्यवसाय, उद्योगधंदे सुरू आहेत. आपण सध्या लागू केलेले नियम हा अंतिम प्रयोग आहे. एवढं होऊन देखील लोकांनी कडक निर्बंधांना गांभीर्याने न घेतल्यास जगाने स्वीकारलेला पर्याय आपल्यालाही स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसेल.

लॉकडाऊनला सगळीकडेच विरोध होतो. जगात ज्या ज्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्या त्या ठिकाणी तेथील लोकांनी लॉकडाऊनला विरोधच केलेला आहे. सरकारसाठी देखील हा पर्याय आनंददायी नसतो. पण लोकांचा जीव वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. हीच आपली प्राथमिकता आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास अंतिम निर्णय घ्यावाच लागेल, असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

(mumbai guardian minister aslam sheikh reaction on full lockdown in maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा