Advertisement

'त्या' पार्टीत कोण मंत्री होते हे सांगा नाहीतर माफी मागा - महापौर

आशिष शेलार यांच्या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिलं आहे.

'त्या' पार्टीत कोण मंत्री होते हे सांगा नाहीतर माफी मागा - महापौर
SHARES

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहरनं आयोजित पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिलं आहे.

"खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा" असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना केलं आहे.

करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह इतर आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले होते.

पार्टीमध्ये राज्य सरकारमधील ( Maharashtra Government) एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला BMC महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आव्हान दिलं आहे. पेडणेकर यांनी यावेळी शेलार यांच्यावर कडाडून टीकाही केली.

"आम्ही शिवसेनेच्या रणरागीणी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. माझ्यावर सिंतोडे उडवले, त्याला मी बघेनच. तुमच्या आरोपांनी आणि पत्रांनी घाबरून जाणार नाही. मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु, जनतेलासुद्धा आता तुमचा खोटारडेपणा समजला आहे. करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत नक्की कोण मंत्री होते? याचा उलगडा करा, नाहीतर जनतेची माफी मागा," असं आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना केलं आहे.

पेडणेकर म्हणाल्या. "कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निष्काळजीपणा करून चालणार नाही. करण जोरहच्या पार्टीत सहभागी सेलेब्रिटींवर पालिकेने योग्य कारवाई केली आहे. परंतु, शेलार यांनी त्या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील एक मंत्रीही उपस्थित होते असा अरोप केला होता. लोकशाहीनं अधिकार दिले आहेत. त्याचा अपमान करू नका. आशिष शेलार आणि भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी वृत्ती वाढत आहे."



हेही वाचा

मुंबईतील २८ डिसेंबरची काँग्रेसची रॅली पुढे ढकलली

''तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी; अरेरावी करण्यासाठी नाही''- राज ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा