Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव?

भाजपने या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे या द्रुतगती मार्गाच्या नामकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव?
SHARES

 मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपने या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे या द्रुतगती मार्गाच्या नामकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. मात्र, नवीन सरकारने समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याची केवळ घोषणा बाकी आहे. 

आधीच्या भाजपा - शिवसेना सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.  त्यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वाद नको, याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव या द्रुतगती मार्गाला देण्यात येईल, याची शक्यता मावळली होती. मात्र, आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आल्याने हा निर्णय सहजतेने झाल्याचं समजतं.

५६ हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांमधील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.हेही वाचा -

खडसे आमचे जुने सहकारी, त्यांना नक्कीच भेटणार- उद्धव ठाकरे

पाठिंबा द्यायचा की नाही? नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून शिवसेना गोंधळात
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा