Advertisement

आ. कातेंची नाराजी दूर करण्यात 'शिवसेना भवन'ला यश!


आ. कातेंची नाराजी दूर करण्यात 'शिवसेना भवन'ला यश!
SHARES

शिवसेनेचे चेंबूरमधील नाराज आमदार तुकाराम काते भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामागचे कारण म्हणजे नाराज काते यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आले आहे. काते यांची नाराजी दूर करण्यासाठी 'शिवसेना भवन'मधून पुढाकार घेण्यात आला. शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी तशी प्रतिक्रिया 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. विशेष म्हणजे ‘मुंबई लाइव्ह’ने तुकाराम काते यांना संपर्क केल्यावर त्यांनी देखील सर्व प्रकरण मिटल्याचे सांगत कोणतीच नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.


का होते तुकाराम काते नाराज ?

शिवसेना मंत्री काम करत नसल्याने शिवसेनेचे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी काते यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. कामे होत नसतील तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. आम्ही सत्तेत आहोत आणि सत्तेत असूनही आमची कामे होत नसतील, तर हे दुःखद आहे. आम्ही आमदार झालो याचेही वाईट वाटते,'' असे म्हणत काते यांनी शिवसेना मंत्र्यांना टार्गेट केले होते.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जेव्हा काते यांच्या मतदार संघात आले होते, तेव्हा त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत देखील केले होते. त्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर आहेत की काय? अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.

आ. काते यांच्या नाराजीच्या बातम्या काही वृत्त वाहिन्यांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. त्यांनी काही वृत्त वाहिन्यांना या संदर्भात मुलाखतीही दिल्या. त्यानंतर शिवसेना भवनने पुढाकार घेऊन त्यांची नाराजी दूर केली.


मी स्वत: काते यांच्याशी बोललो त्यांची नाराजी काय आहे ते मी जाणून घेतले. त्यावेळी ते म्हणाले की मी ज्या मतदार संघातून निवडून आलो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो आहे. भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या उमेदवाराला मी पराभूत केले आहे. त्यामुळे त्या मतदार संघातील लोकांची कामे होणे गरजेच आहे. त्यांचे हे म्हणणे मी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यांनतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाल्यावर त्यांची नाराजी दूर झाली. ते भाजपामध्ये जातील अशा पद्धतीच्या बातम्या धादांत खोट्या होत्या.
- हर्षल प्रधान, शिवसेना जनसंपर्क प्रमुख



हेही वाचा -

विषय एक, पत्रकार परिषदा दोन, शिवसेना मंत्र्यांचं चाललंय काय?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा