'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे'

प्रभादेवी - विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलाय. शनिवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. अर्थसंकल्पाच्या प्रतीही जाळण्यात आल्या. त्यानंतर काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 अशा एकूण 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी का? आणि केलेल्या कर्जमाफीचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतो का? याविषयी आम्ही आमच्या 'मुंबई बोले तो' या कार्यक्रमात जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments