Advertisement

मुस्लीम भाजपाशी जोडले जात आहेत - हाजी अराफात


SHARES

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपा वाहतूक संघटनेचे नेते हाजी अरफात यांनी रिक्षा, टॅक्सी, बस आणि जड वाहनांपुढील समस्यांबाबत राज्याचे वाहतूक आयुक्त शेखर चेन्ने यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई लाइव्हशी बोलताना हाजी अरफात म्हणाले की, वाहतूक आयुक्तांशी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे.  पार्किंग ठेकेदारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे. 


मुस्लीम भाजपाबरोबर

भाजपा मुस्लीमविरोधी आहे, या आरोपाचा अरफात यांनी यावेळी समाचार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पसरवलेला हा आरोप खोटा आहे. या आरोपात काहीच तथ्य नाही. आता मुस्लिमांनाही समजलं आहे की त्यांचा विकास भाजपाच करू शकते. त्यामुळे मुस्लीम आता भाजपाशी जोडले जात आहेत, असं अराफत यावेळी म्हणाले. 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा