Advertisement

यापुढं महाराष्ट्रात काँग्रेसच एक नंबरचा पक्ष- नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात बाळासाहेब थोरात यांच्याकडून पदभार स्वीकारला.

यापुढं महाराष्ट्रात काँग्रेसच एक नंबरचा पक्ष- नाना पटोले
SHARES

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. पदभार स्वीकारताच काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. यापुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. राज्यसभेतील भाषणातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील देशात मात्र हेच दर लिटरमागे १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. केंद्र सरकारकडून देशातील जनतेची लूट सुरु आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपविरोधाच सूर आणखी तीव्र केला.

हेही वाचा- आंदोनकर्त्या शिक्षकांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी- अमित ठाकरे

भाजप सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. भाजपच्या (bjp) या विखारी प्रचाराच उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे, असंही पटोले म्हणाले.

पदभार स्वीकारण्याआधी नाना पटोले यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर दादर येथील जैन मंदिराला भेट दिली. पुढे चैत्यभूमीवर जाऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माहीम दर्गा इथं जाऊन चादर अर्पण केली तसंच माहीम चर्चलाही भेट दिली. त्यानंतर पाटोले यांनी गुरु तेग बहादूर नगर येथील दशमिरा दरबार गुरुद्वारा इथं जाऊन अभिवादन केलं.

टिळक भवन येथील कार्यक्रमानंतर मुंबईत काँग्रेसने (congress) शक्तीप्रदर्शन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. 

(nana patole took a officially charge of maharashtra committee president from balasaheb thorat)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा