Advertisement

मुंबईकर केतकर, राणे, देसाईंनी घेतली खासदारकीची शपथ


मुंबईकर केतकर, राणे, देसाईंनी घेतली खासदारकीची शपथ
SHARES

राज्यसभेवर निवडून गेलेल्या खासदारांना मंगळवारी खासदारकीची शपथ देण्यात आली. यात केंद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, नारायण राणे, शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसकडून कुमार केतकर तर राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. केतकर यांनी इंग्रजीतून, राणे यांनी हिंदीतून आणि अनिल देसाई यांनी मराठीतून शपथ घेतली.

राणे, मुरलीधरन आणि केतकर हे पहिल्यांदाच संसदेत गेले आहेत, तर वंदना चव्हाण आणि अनिल देसाईंची ही दुसरी टर्म आहे. प्रकाश जावडेकर गेली अनेक वर्षे दिल्लीच्या राजकारणात आहेत व ते सातत्याने राज्यसभेवर निवडून जात आहेत.


राज्यातला कोटा पूर्ण- राणे

मी राज्यातील सर्वच पदे भूषविली आहेत. त्यामुळे माझा राज्यातील कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता मला राज्यसभेत काम करायला आवडेल. माझी खासदारकी म्हणजे गडचिरोलीची शिक्षा नव्हे. या ठिकाणाहून देशाचा कारभार चालतो. त्यामुळे मी दिल्लीत समाधानी असल्याची प्रतिक्रिया नारायण राणेंनी आपल्या खासदरकीबद्दल दिली.हेही वाचा-

नारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा