Advertisement

नारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार?


नारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार?
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपा राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. असं असतानाच शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्या उमेदवारीवरून अनेक प्रश्न उपस्थित करत भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

याचसोबत जानकर, मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्या भाजप सदस्यत्वावर प्रश्न उभे राहिले आहेत. हे सगळे ही स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांना भाजपची आमदारकी कशी दिली? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राणे उमेदवारीचे प्रकरण राणेंना नाही, पण मित्रपक्षांना चांगलंच शेकत आहे.


कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

नारायण राणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला, त्यांना भाजपाने उमेदवारी दिली असेल तर भाजपाचे सदस्यत्व कधी स्वीकारले? सदस्य असतील तर त्याची काही पावती आहे का? नेमका कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले? जर नारायण राणे यांनी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


नियम काय सांगतो?

कारण एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करून घ्यावं लागतं तरच त्या पक्षाला बी फॉर्म देता येतो, असा नियम आहे. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपने सदस्यत्व कधी दिलं? जर दिलं नसेल तर त्यांना राज्यसभा उमेदवारी कशी दिली? असे अनेक सवाल करत शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अॅड. अनिल परब यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा