Advertisement

नारायण राणेंनी जाहीर केली भाजपा प्रवेशाची तारीख, 'ह्या' दिवशी होणार प्रवेश

खासदार नारायण राणे यांचा भाजपातील प्रवेश अनिश्चितच राहिला आहे. प्रवेशावरून भाजपा नेतृत्वाने त्यांना झुलवत ठेवलं आहे. आता मात्र राणे यांनी स्वतःच भाजपा प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे.

नारायण राणेंनी जाहीर केली भाजपा प्रवेशाची तारीख, 'ह्या' दिवशी होणार प्रवेश
SHARES

मागील अनेक महिन्यांपासून भाजपात मेगा भरती सुरू आहे. मात्र, खासदार नारायण राणे यांचा भाजपातील प्रवेश अनिश्चितच राहिला आहे. प्रवेशावरून भाजपा नेतृत्वाने त्यांना झुलवत ठेवलं आहे. आता मात्र राणे यांनी स्वतःच भाजपा प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष १५ ऑक्टोबर रोजी भाजपात विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राणे यांचा भाजपा प्रवेश होणार आहे. 

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा होत्या. राणे भाजपाचे सहयोगी खासदार आहेत. मात्र, त्यांना अद्याप भाजपात प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्यांचा प्रवेश काही निश्चित होत नव्हता.

अखेर नारायण राणे यांनी स्वतः भाजपा प्रवेशाची तारीख जाहीर केली. राजन तेली यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे आलेले असताना नारायण राणे यांनी भाजपा प्रवेशाची माहिती दिली. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला जाणार आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा