Advertisement

‘वंचित’च्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची रेड, मिळाली ‘इतकी’ रक्कम

चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर बुधवारी प्राप्तिकर खात्याने धाड टाकली. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा खान यांनी केला आहे.

‘वंचित’च्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची रेड, मिळाली ‘इतकी’ रक्कम
SHARES

चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर बुधवारी प्राप्तिकर खात्याने धाड टाकली. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा खान यांनी केला आहे.

दिवसभर चौकशी

वंचितचे उमेदवार अबुल खान यांचं अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील गरीब नवाज काॅर्पोरेशन इथं कार्यालय आहे. या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा मारला. दिवसभर कार्यालयात चौकशी सुरू होती. छापा मारला त्यावेळेस कार्यालयात ५ जण उपस्थित होते. प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कार्यालयात १ हजार १०० रुपयांची रोख रक्कम मिळाली.  

सूडबुद्धीने कारवाई

या कारवाईची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस डाॅ. ए. आर. अंजारिया आणि अबुल खान यांनी दिली. भाजप-शिवसेनेने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

हेही वाचा-

राज्यभरात ४० लाख बोगस मतदार, निवडणूक थांबवा - प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नकोच- प्रकाश आंबेडकर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा