Advertisement

राज्यभरात ४० लाख बोगस मतदार, निवडणूक थांबवा - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम पाठोपाठ मतदार यादीवर निशाणा साधला आहे. मतदान यादीत घोळ असल्याचं म्हणत आंबेडकर यांनी चक्क आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे.

राज्यभरात ४० लाख बोगस मतदार, निवडणूक थांबवा - प्रकाश आंबेडकर
SHARES

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम पाठोपाठ मतदार यादीवर निशाणा साधला आहे. मतदान यादीत घोळ असल्याचं म्हणत आंबेडकर यांनी चक्क आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचं कारस्थान 

प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएम बरोबरच इतर सर्व पर्याय शोधत आहे. त्यासाठीच राज्यभरात ४० लाख बोगस मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आली आहे. एकाच इपिक क्रमांकावर दोन मतदार दाखविण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या याद्यांचं निरीक्षण करूनच आपण हे विधान करत असल्याचे ते म्हणाले.    

मतदार यादी दुरूस्त करा

ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देणार असून निवडणूक प्रक्रिया थांबवून याद्या दुरूस्त केल्यानंतरच निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. वंचित बहुजन आघाडीच्या संकेतस्थळावर मतदार यादी उपलब्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा-

आघाडीच्या शपथनाम्यात ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या

काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा