Advertisement

कार्यकर्ते अधीर... भुजबळांचा रुग्णालयातच सत्कार!

खरंतर भुजबळ सोमवारी रुग्णालयाबाहेर पडून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असं म्हटलं जात होतं. परंतु डाॅक्टरांनी त्यांना डिस्चार्ज न दिल्याने पुढील सभा, कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यानंतर भुजबळ फेसबुक लाइव्हद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असंही म्हटलं जात होतं. परंतु फेसबुक लाइव्ह देखील न झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी थेट रुग्णालयाचाच रस्ता धरला.

कार्यकर्ते अधीर... भुजबळांचा रुग्णालयातच सत्कार!
SHARES

प्रकृती अस्वाथ्यामुळे सध्या केईएम रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. सोमवारी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि पेढे देऊन त्यांचा रुग्णालयातच छोटेखानी सत्कार केला.

थेट रुग्णालयाचा रस्ता

खरंतर भुजबळ सोमवारी रुग्णालयाबाहेर पडून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असं म्हटलं जात होतं. परंतु डाॅक्टरांनी त्यांना डिस्चार्ज न दिल्याने पुढील सभा, कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यानंतर भुजबळ फेसबुक लाइव्हद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असंही म्हटलं जात होतं. परंतु फेसबुक लाइव्ह देखील न झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी थेट रुग्णालयाचाच रस्ता धरला.

कार्यकर्त्यांसोबत चर्चा

त्यानुसार सोमवारी नाशिकहून आलेल्या कार्यकर्त्यांनी केईएम रूग्णलयात जाऊन भुजबळांची भेट घेतली आहे. भुजबळांनी त्यांच्यासोबत जवळपास २२ मिनिटापर्यंत चर्चा केली. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी भुजबळांसाठी आणलेली बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे आणि मोठा हार घालून त्यांचा सत्कार केला.

आणखी २ दिवस रुग्णालयात

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका झाली असली, तरी भुजबळांवर सध्या केईएम रुग्णालयात स्वादुपिंड तसंच मधुमेहावर उपचार सुरू अाहेत. आणखी दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डाॅक्टरच घेणार आहेत.

भुजबळांची प्रकृती सुधारेपर्यंत तरी भुजबळ समर्थकांना आपल्या आवडत्या नेत्याचा आवाज ऐकण्यासाठी वाट पाहावी लागेल हे निश्चित.

हेही वाचा-

भुजबळांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएममध्येच

छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा काय अाहे? इथे वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा