अखेर तुकाराम मुंढे यांची बदली

 Mumbai
अखेर तुकाराम मुंढे यांची बदली

मुंबई - राज्य सरकारने अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केली. त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. मात्र तुकाराम मुंढे यांची बदली कुठे होणार आहे? याबद्दल अजून काही सांगण्यात आलेले नाही. 

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई भागातील अवैध बांधकामाबाबत घेतलेली भूमिका तुकाराम मुंढे यांच्या बदली मागे आहे असे सांगितले जात आहे. अनधिकृत बांधकामाबद्दल राज्य सरकारने वेगळी भूमिका न्यायालयात मांडली होती. 

तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चा उघडला होता. त्यांच्या विरोधात नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव 105 विरुद्ध 6 असा मंजूरही केला होता. मात्र मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांची बदली होऊ शकली नाही. त्यांच्या धडाकेबाज कामामुळे नवी मुंबईकरांमध्ये ते कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांची बदली होऊ नये यासाठीही नागरिकांनी मोहीम चालावली होती.

Loading Comments