Advertisement

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वांद्रे कोर्टाने सुनावली आहे. ​​​​

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वांद्रे कोर्टाने सुनावली आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर खार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक चौकशीसाठी राणा दाम्पत्याची ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केली होती. मात्र, वांद्रे न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

वांद्रेच्या सुट्टीच्या न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी झाली. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. तर, राणा दाम्पत्याच्या जामिनासाठी त्यांचे वकिल रिझवान मर्चंट यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली.

मात्र, जामिनाच्या याचिकेवर वांद्रे कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी पक्षाला २७ एप्रिलला जामिनाच्या याचिकेवर लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. तर, २९ एप्रिलला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामिनावर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.

राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हाच चुकीचा आहे. राणा दाम्पत्यानं कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. अटकेपुर्वी पोलिसांनी कोणतीही नोटीसदेखील दिली नाही.

दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय अमरावतीच्या राणा दांपत्यांनी केला होता.

राणा दाम्पत्यानं चिथावणीखोर वक्तव्याचा केल्याचा आरोप करत काल पोलिसांनी त्यांना खार इथल्या निवासस्थानातून अटक केली होती. रात्री खार पोलिस स्टेशनमध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी आपल्याला बेकायदा अटक केली आहे. त्यामुळे जामीन घेण्यास राणा दाम्पत्याने नकार दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.



हेही वाचा

शिवसेना कार्यकर्त्यांचा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा