Advertisement

राष्ट्रवादीचे आमदार फुटणार ही तर केवळ अफवा- नवाब मलिक

जे संकटकाळात सोडून गेले नाहीत, ते आता सोडून जाणं शक्य नाही. त्यामुळे काही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार फुटणार ही तर केवळ अफवा- नवाब मलिक
SHARES

जे संकटकाळात सोडून गेले नाहीत, ते आता सोडून जाणं शक्य नाही. त्यामुळे काही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या वृत्ताचं खंडन केलं. एवढंच नाही, तर भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येण्यासं इच्छुक असल्याचाही दावा केला. (nawab malik clarifies on rumors about ncp mla to join bjp)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील थोडे थोडके नव्हे, तर १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसं झाल्यास राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. एवढंच नाही, तर त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारदेखील या धक्कातंत्रामुळे डळमळीत होऊ शकतं, असं म्हटलं जात होतं. यामागे भाजपचा नेमका कोणता मोठा नेता गुंतलेला आहे, यावर तर्कवितर्क सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या धक्कातंत्राला सुरूंग लावला आहे. 

हेही वाचा - माझं नाव गद्दारांच्या यादीत नाही, गुलाबराव पाटलांनी राणे पितापुत्रांना सुनावलं

काही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त खोटं आहे. उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादी काँगेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. पण यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

ते पुढं म्हणाले, काही बेजबाबदार चॅनेलच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार मागील ७ ते ८ महिन्यांपासून घरवापसीसाठी इच्छुक आहेत. परंतु पक्षाने अद्याप त्यांच्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. या अफवांकडे पाहता आमदारांच्या बाबतील लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल आणि भाजप रिकामा करण्याचं काम हाती घेण्यात येईल. काही नेत्यांनी याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चूक झाल्याची कबुली दिली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते बोलत आहेत, इतर नेत्यांशी बोलत आहेत, तेव्हा कुठल्याही अटीशर्थी न घालता त्यांना पक्षात पुन्हा घेतलं जाईल. केवळ राष्ट्रवादीच नाही, तर काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेतेही घरवापसीच्या प्रतिक्षेत आहे, काँग्रेसचा निर्णय काँग्रेस घेईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा