सर्व कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारच्या अयशस्वी कामांना जनतेसमोर आणा- अजित पवार

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानं आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फडणवीस सरकारचे घोटाळे आणि अयशस्वी कामांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. तसंच, सरकारच्या अयशस्वी कामांना जनतेसमोर आणण्याचं आवाहन देखील केलं आहे.

SHARE

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानं आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फडणवीस सरकारचे घोटाळे आणि अयशस्वी कामांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. तसंच, सरकारच्या अयशस्वी कामांना जनतेसमोर आणण्याचं आवाहन देखील केलं आहे.

घोटाळे उघड

'आपण देवेंद्र फडणवीस सरकारचे घोटाळे उघड केले, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना क्लिन चीट जारी केली.  राज्य सरकारनं रोजगाराच्या मोर्चाचं खराब प्रदर्शन केलं आणि आरक्षणाच्या समस्येवर मराठा, धनगर समाजाला धोका दिला. फडणवीस सरकारचं हे अपयश जनतेसमोर उघडकील आणलं पाहिजे', असं कार्यकर्त्यांना संबोधिताना अजित पवार यांनी म्हटलं.

युवा नेत्यांना संधी

त्याशिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधिताना सांगितलं की, 'राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष २० वर्षांपूर्वी निर्माण झाला असून, सत्तेत देखील आला होता. त्यावेळी युवा नेत्यांना संधी देण्यात आली होती. तसंच, हे युवा नेते मंत्री बनले आणि पक्षाच्या विस्ताराला मदत मिळाली होती'.हेही वाचा -

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची

नाल्यांनंतर आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या