दिंडोशीत राष्ट्रवादी काँग्रेसला गळती

 Malad
दिंडोशीत राष्ट्रवादी काँग्रेसला गळती
Malad, Mumbai  -  

मालाड - राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे दिंडोशीत राष्ट्रवादीला फटका बसला आहे. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादीला खिंडार पडलंय. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातातील घड्याळ सोडत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.

राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष प्रशांत घोलप, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या सानिका शिरगावकर, संदीप डांगे यांच्यासह प्रभाग क्रमांक 38, 40, 42 च्या अनेक कार्यकर्त्यांनी विद्यमान नगरसेवक प्रशांत दशरथ कदम, विभाग अधिकारी रुपेश श्याम कदम, शाखाप्रमुख राजेंद्र घाग आणि प्रभाग क्र 42 च्या उमेदवार रिना सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

Loading Comments