Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

पुन्हा सत्तेत येणार नाहीत या नैराश्येतून कारवाई- शरद पवार

आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना माहीत आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा राजकीय विरोधांच्या विरूद्ध गैरवापर केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली.

पुन्हा सत्तेत येणार नाहीत या नैराश्येतून कारवाई- शरद पवार
SHARES

आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना माहीत आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा राजकीय विरोधांच्या विरूद्ध गैरवापर केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप (bjp) सरकारवर केली.

शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालयाच्या ठिकाणी ईडीने छापे टाकून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतलं. यावरून सकाळपासूनच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार (sharad pawar) यांनी कारवाईच्या मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी संस्थांचा वापर केला जात आहे. हे नक्कीच शोभनीय नाही. आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, हे त्यांना कळलं आहे. त्यामुळेच केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

हेही वाचा- ठाण्यातील शिवसेना नेते, मंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले- निलेश राणे

हे जे काही सुरू आहे, ते म्हणजे विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. पुढच्या ३ महिन्यांत महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे इतक्या वर्षांपासून राजकारणात आहेत, परंतु त्यांना ज्योतिषशास्त्र अवगत असल्याचा गुण मला ठाऊक नव्हता, अशी मिश्कील टिपण्णी देखील शरद पवार यांनी केली.

तर, प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही काळात अर्णब गोस्वामी, कंगना राणौत आणि अन्वय नाईक ही प्रकरणं लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. ईडी ही एका पक्षाची राजकीय शाखा असल्याप्रमाणं काम करते आहे. ज्यांचे आदेश ईडी पाळत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडं पाठवून देतो. करा कारवाई, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

(ncp chief sharad pawar comment over ed raid on pratap sarnaik house)

हेही वाचा- एक महिला घरी नसताना केलेल्या कारवाईत कोणती मर्दानगी होती?- प्रवीण दरेकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा