Advertisement

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांनी त्यांना घरी आराम करण्यास सांगितलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.  

काही दिवसांपूर्वी पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर काही दिवसांच्या अंतराने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पित्ताशयात खडे झाल्यामुळे शरद पवार यांना प्रचंड पोटदुखीचा त्रास होत होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यातच शरद पवार नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर असल्याचं आढळून आलं होतं. रविवारी २५ एप्रिलला शस्त्रक्रिया करून अल्सर काढून टाकण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आलं.

हेही वाचा- तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका

आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते आता घरी आराम करतील, असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी  राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून राज्यातील सहकारी आणि खाजगी १९० कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. 

(ncp chief sharad pawar gets discharged from breach candy hospital after 3 operation)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा