Advertisement

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच केला होता. त्यावर राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात जाती आधीपासून होत्याच. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. जातीवर आजही मतदान होतं. मात्र सध्या महाराष्ट्राच दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून म्हणजे राष्ट्रवादीच्या जन्मापासून सुरु झालं. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. 

हेही वाचा- ‘या’ पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढला- राज ठाकरे

महाराष्ट्रात मराठी बोलणारे लोकं जसी आपली भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता जपून आहेत, तशीच तामिळ, गुजराती, बंगाली बोलणारे लोकं आपापल्या राज्यात अस्मिता बाळगून आहेत. भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती देश निर्माण होण्याच्याही आधीपासूनच आहेत, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी भाषा आणि संस्कृती दुसऱ्यांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा लोकांना कमजोर करणं योग्य नाही. किती वर्ष उत्तर आणि दक्षिणेत सुरु असलेला संघर्ष आपण पाहिला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा भारत आजपर्यंत आपण पाहत आलो असून त्यातूनच या गोष्टी बिघडल्या आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

तर, राज ठाकरेंना जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचं आकलन नाही, तसंच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही, असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही राज ठाकरेंवर टीका केली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा