Advertisement

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे? राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र

राज्यपालांच्या पुस्तकाला अभिप्राय देताना उद्धव ठाकरेंना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख पुस्तकात दिसून आला नाही, असं म्हणत पवारांनी राज्यपालांना शालजोडीतला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख कुठे? राज्यपालांना शरद पवारांचं खरमरीत पत्र
SHARES

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नुकतंच एक कॉफी टेबल पुस्तक पाठवलं. या पुस्तकाला अभिप्राय देताना उद्धव ठाकरेंना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख पुस्तकात दिसून आला नाही, असं म्हणत पवारांनी राज्यपालांना शालजोडीतला लगावला आहे. (ncp chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari over secularism)

काय लिहिलंय पत्रात?

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित ‘जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररूप काॅफी टेबल बुक प्राप्त झाले. वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा नामोल्लेख आढळत नाही. तरीदेखील राज्य शासनाच्या वतीने अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, आपल्या एक वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध काॅफी टेबल बुक मला पाठवण्यात आले, याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

काॅफी टेबल बुकचे अवलोकन केले असता, त्यामध्ये आपल्या मर्यादीत कालावधीतील एखाद-दुसरा शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या-मान्यवरांच्या गाठीभेटी इतर सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली.

तसेच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहिती पुस्तकात दिसून आली नाही. 

असो. आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला, याबद्दल मी आपला पुनश्च: आभारी आहे. 

काय आहे वाद?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्त्वाची आठवण करून देत मंदिरं खुली करण्याबाबत विचारणा केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत दिलेलं उत्तर साेशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिल्यानंतर भाजप नेत्यांचा तिळपापड झाला होता. यावरून गृहमंत्री अमित शहांनी देखील राज्यपालांचं चुकलंच असं मत व्यक्त केलं होतं.  


हेही वाचा - 

जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर 

कधी कधी प्रमाणपत्राची गरज लागते, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका 


Read this story in English
संबंधित विषय