Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

भारतातील रियल इस्टेट कोसळण्याच्या स्थितीत, शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

लाॅकडाऊनचा मोठा फटका भारतातील रियल इस्टेट स्टेक्टरला देखील बसला आहे. यामुळे आजघडीला रियल इस्टेट सेक्टर पूर्णपणे कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे.

भारतातील रियल इस्टेट कोसळण्याच्या स्थितीत, शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका भारतातील रियल इस्टेट स्टेक्टरला देखील बसला आहे. यामुळे आजघडीला रियल इस्टेट सेक्टर पूर्णपणे कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. (ncp chief sharad pawar written a letter to pm narendra modi over  current scenario of real estate sector in India amidst the covid 19 and lockdown )त्यामुळे या क्षेत्रात लक्ष घालून ताबडतोब उपाययोजना करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात की, लाॅकडाऊनमुळे साधारणत: ३ महिन्यांपासून बांधकामे रखडली आहेत. मजुरांच्या हाताला रोजगार नाही. खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण ठप्प आहे. परिणामी रियल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये रियल इस्टेट क्षेत्रातचंही मोठं योगदान आहे. अशा स्थितीत या क्षेत्राला सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे.

 कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (CREDAI) देखील यासंदर्भात एक पत्र लिहिले या पत्रात रियल इस्टेट क्षेत्राला मदत करण्यासाठी वन टाइम पुनर्रचना, अतिरिक्त संस्थागत निधी, दंडात्मक व्याज माफी, जीएसटीत सवलत, कच्च्या मालाची सहज उपलब्धता करून देण्याची मागणी केली आहे.

रियल इस्टेट क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधानांनी त्वरित हस्तक्षेप करून या क्षेत्राला सहकार्य करावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा