Advertisement

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष? राष्ट्रवादीनेच केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी)चे अध्यक्ष होणार अशा बातम्या सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत.

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष? राष्ट्रवादीनेच केला खुलासा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (sharad pawar) हे यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी)चे अध्यक्ष होणार अशा बातम्या सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत. परंतु यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेच खुलासा करण्यात आला असून अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी मागील अनेक वर्षांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाचा भार सांभाळत आहेत. परंतु सोनिया गांधी लवकरच या पदावरुन निवृत्त होणार असून त्यांच्या जागी शरद पवार यांची नियुक्ती होण्याची चर्चा रंगला आहे. सोनिया गांधी निवृत्त झाल्यास यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार हे अगदी योग्य व्यक्ती आहेत. यूपीएतील सर्वच घटक पक्षांसोबत शरद पवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवाय भाजप देशाच्या राजकारणात वरचढ ठरत असताना इतर सहकारी पक्षांची मोट बांधण्यासाठी या पदाला अनुभवी, चतूर राजकारण्याची गरज भासत आहेत. शरद पवार यांच्यात ही सर्व वैशिष्ट्ये असल्याने तेच या पदासाठी योग्य असल्याचं म्हटलं जात आहेत. 

हेही वाचा- “माझी चूक झाली”, शरद पवार पत्रकार परिषद साेडून निघून गेले

परंतु राजकीय वर्तुळातून यासंबंधितच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये शरद पवार आणि यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत ज्या बातम्या प्रसारीत होत आहेत, त्या सर्व निराधार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटलं आहे. यूपीएमध्ये अशा कुठल्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काही जणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे, असंही तापसे म्हणाले.

तर ज्या प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहेत, त्याची कल्पना शरद पवार यांनाही नसेल. काँग्रेस पक्ष जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना करण्यात आली होती. सर्वात मोठ्या पक्षातूनच यूपीएचा अध्यक्ष होतो. आजही विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच असल्याने काँग्रेसचाच अध्यक्ष असेल, यात शंका नाही. देशात शेतकरी आंदोलनाने जोर पकडलेला असताना गोंधळ निर्माण करण्यासाठी वा लोकांचं लक्ष या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठीच अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी केला. 

(ncp clarifies on sharad pawar and upa chairmanship)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा