Advertisement

ठाण्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

ठाण्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
Image Source: Mukund Keni's Facebook Profile
SHARES

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद केणी (ncp corporator died in thane due to covid-19) यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी मिरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ ही दुसरी घटना आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केणी यांच्या दुःखद निधनाची माहिती दिली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपला एक मजबूत शिलेदार गमावला, अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बरेच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना योग्य प्रतिसाद देत या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. 

हेही वाचा- मिरा- भाईंदरमधील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू 

कोरोना रुग्णाकडून लागण

मुकुंद केणी हे ठाण्यातील कळवा भागातील नगरसेवक होते. पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले केणी नंतर राजकारणात आले. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. केणी एका कोरोनाबाधित रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. सुरूवातीला त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यावर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यांना मधुमेह आणि इतर काही त्रास असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिली आहे.

रुग्णांमध्ये वाढ

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे १४५ नवीन रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत ठाण्यात कोरोनाचे ४३४३ रुग्ण आढळले असून आतापर्यंत १२९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ठाण्यात २२६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मंगळवारी मिरा-भाईंदरचे शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हरिश्चंद आंमगावर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.  

 ५५ वर्षीय नगरसेवकाला दोन आठवड्यापूर्वी कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या नगरसेवकाची पत्नी आणि आईलाही करोनची लागण झाली असून त्यांवर उपचार सुरु आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा