Advertisement

इंधन दरवाढीवरोधात राष्ट्रवादीची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी

राष्ट्रावादीनं मोदी सरकारवर निषाणा साधत पोस्टरबाजी केली आहे.

इंधन दरवाढीवरोधात राष्ट्रवादीची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी
SHARES

वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीनं कठोर पावलं उचलली आहेत. राष्ट्रावादीनं मोदी सरकारवर निषाणा साधत पोस्टरबाजी केली आहे. राज्यामध्ये धन्यवाद मोदी सरकार ही मोहिम राष्ट्रवादीनं सुरू केली आहे.  

या मोहिमेअंतर्गत ‘धन्यवाद मोदी सरकार’, अशा आशयाचे बॅनर्स लावून सर्वसामान्यांवरचा महागाईचा मार कमी करावा, अशी मागणी या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यांत ६७० रुपयांना असणारा गॅस सिलेंडर हा १०० रुपयांना वाढला आणि ७७० रुपयांना झाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गॅस दरवाढीची नोंद ही फेब्रुवारी महिन्यातली आहे. आता पुन्हा मार्च महिन्यात गॅस दरवाढ ५० रुपयांनी वाढली. त्यामुळे आज हा दर ८२० रुपयांपर्यंत गेला आहे.

केंद्र सरकारनं दिवसेंदिवस केलेली गॅस दरवाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढ याबाबत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला भगिनी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहोत, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी साहेब आपण सत्तेत येण्यापूर्वी आम्हा महिला भगिनींना तुम्ही आश्वासन दिलं होतं की, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवू. पण आपण कोणतंही आश्वासन पाळलं नाही, असंही चाकणकर म्हणाल्या.

५ कोटी महिलांपर्यंत आपण उज्वला गॅस योजना पोहोचवणार असं सांगितलं पण गेल्या काही दिवसांत केलेल्या जहिराती आता जनतेसमोर येत आहेत. किती महिलांपर्यंत ही योजना पोहोचली, हा एक संशोधनाचाच भाग आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर आपण जहिराती लावल्या. त्या जहिराती आमच्या कराच्या पैशातून लावल्या आहेत. या सगळ्या जहिराती फसव्या आहेत. आम्हा महिला भगिनींमध्ये हीच संतापाची लाट आहे, असं म्हणत चाकणकर यांनी संताप व्यक्त केला.



हेही वाचा

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप

कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा