Advertisement

रणजितसिंह मोहिते पाटील अखेर भाजपात

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी मागील आठवड्यातच भाजपामध्ये प्रवेश केला होता. आघाडीतील दोन्ही मोठ्या नेत्यांच्या मुलांनी बंडखोरी केल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील अखेर भाजपात
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर बुधवारी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. मुंबईत गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष देशमुख यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 


आघाडीला धक्का

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी मागील आठवड्यातच भाजपामध्ये प्रवेश केला होता. आघाडीतील दोन्ही मोठ्या नेत्यांच्या मुलांनी बंडखोरी केल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळू शकते. 


उमेदवारी न मिळाल्याने

यंदाची लोकसभा निवडणूक माढा लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची घोषणा शरद पवार यांनी आधी केली होती. त्यामुळे येथील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील नाराज झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात होतं. मात्र रणजितसिंह मोहिते पोटील यांनी आधीच भाजपाशी बोलणी सुरू केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही उमेदवार याद्यांमध्ये माढाची उमेदवारी जाहीर करण्याचं टाळलं होतं. आपले चिरंजीव रणजितसिंह यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांकडे धरला होता. मात्र, उमेदवारी जाहीर न झाल्याने रणजितसिंह यांनी अखेर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 



हेही वाचा - 

राज ठाकरे यांनी मोदी-शाह विरुद्ध घेतलेल्या भूमिकेचं सचिन अहिरांकडून स्वागत

मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा