Advertisement

विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड

विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड
SHARES

विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावे आघाडीवर होती. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

सरकारमध्ये असताना अजित पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता. त्याशिवाय अजित पवार आपल्या वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाली.

‘अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते. अजित पवारांनी दिलेला शब्द हा मोडला जात नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे स्थिर आहेत. मात्र अजित पवार हे वक्तशीर आहेत. मागच्या काळात मंत्रालय बंद राहिलं असतं. मात्र अजित पवारांमुळे उघडायला लागायचं. काम होणार असेल, नसेल तर ते तोंडावर सांगतात. त्यांना सर्व प्रकारची चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांचा आणि माझा जन्मदिवस एकच आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते एकदा अडचणीत आले. मात्र आत्ता ते विचार करून बोलतात’, अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी शुभेच्छाही दिल्या.



हेही वाचा

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा