Advertisement

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच पेट्रोल-डिझलचे दर कमी होणार आहेत.

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
SHARES

मुंबईकरांसाठी एक खुषखबरी आहे. लवकरच पेट्रोल-डिझलचे दर कमी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की, लवकरच राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावेळी समारोपाच्या भाषणावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही ते म्हणाले. तसेच पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करेल अशीही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येईल."

मे महिन्यात केंद्र सरकारनं इंधनाच्या किमतीतून उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. मे महिन्यात म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या कमी होतील. शिंदे सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे.



हेही वाचा

नवीन एलपीजी गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागतील 'इतके' पैसे

मुंबईत ब्रेडच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ, 'हे' आहेत नवे दर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा