Advertisement

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, ‘हे’ आहे का कारण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून त्यांचा राजीनामा शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, ‘हे’ आहे का कारण?
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून त्यांचा राजीनामा शुक्रवारी मंजूर करण्यात आला. पवार यांनी राजीनामा नेमका का दिला? याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

मुंबईत अनुपस्थित

काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालया (ED)ने राज्य शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, शरद पवार यांच्यासहीत ७० जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचं ठरवलं होतं. परंतु यामुळे कायदा सुव्यवस्था बिघण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिस आयुक्तांच्या विनंती नंतर पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

नेतेही अनभिज्ञ

या दरम्यान राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तर राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी उपस्थित होते. परंतु यांत अजित पवार यांचा मात्र समावेश नव्हता. यावर प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केल्यावर ते पुण्यात पूरग्रस्तांची पाहणी करत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अजित पवार यांनी मुंबईत संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयात स्वत: उपस्थित राहून राजीनामा दिल्याची माहिती बागडे यांनी दिली. त्या अगोदर २ दिवसआधी त्यांनी बागडे यांना फोन करून तशी कल्पनाही दिली होती.

का दिला राजीनामा?

अजित पवार यांनी राजीनामा नेमका केव्हा दिला आणि का दिला? याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही नसल्याने या राजीनाम्यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीने शरद पवार यांना ईडीच्या मुद्द्यावरून पाठिंबा देण्यात आला, तेवढा पाठिंबा अजित पवार यांना मिळाला नाही, यावरून ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरा तर्क असा काढला जात आहे की ते साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी राजीनामा दिला, तर तिसऱ्या तर्कानुसार पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी अचानक राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.  

मतभेदांची कारणं? 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आलेत. ईव्हीएमच्या मुद्द्यावर दोघांमध्ये सर्वात मोठा मतभेद समोर आला होता.  केंद्र सरकारने कलम ३७० काढल्यानंतर पवारांनी त्याचा विरोध केला होता, तर अजित पवारांनी त्याचं समर्थन केलं होतं.  सभांमध्ये यापुढे राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवाही दिसेल असं अजित पवार म्हणाले होते, मात्र शरद पवारांनी त्यालाही विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानेही ते नाराज होते.


हेही वाचा-

शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल

ईडीच्या चौकशीपासून राज ठाकरे बोलायचे कमी झालेत- अजित पवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा