Advertisement

एकनाथ खडसेंना मोठा दणका, ईडीकडून जावयाला अटक

एकनाथ खडसे देखील आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती.

एकनाथ खडसेंना मोठा दणका, ईडीकडून जावयाला अटक
SHARES

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आता मोठा दणका बसला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरींना ईडीने मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावलं होतं.  १३ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचं बुधवारी सकाळी जाहीर केलं. त्यांच्या अटकेमुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे देखील आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. 

खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं. यानंतर खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना  एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०२६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.

एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसेंनी केला होता.



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा