Advertisement

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तत्काळ कोरोना चाचणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि त्यांच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी नुकतंच भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांना वैतागूनच आपण पक्ष सोडल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. तसंच यापुढे राष्ट्रवादीसाठी जोमाने काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्याRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा