Advertisement

भाजप नेते रेमडेसिवीर कसं खरेदी करू शकतात?, जयंत पाटलांचा सवाल

राज्य सरकार, स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना माहिती न देताच रेमडेसिवीर औषध भाजपचे नेते कसं काय खरेदी करु शकतात?, असा कुठला नवीन कायदा आला आहे का?, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप नेते रेमडेसिवीर कसं खरेदी करू शकतात?, जयंत पाटलांचा सवाल
SHARES

राज्य सरकार, स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना माहिती न देताच रेमडेसिवीर औषध  भाजपचे नेते कसं काय खरेदी करु शकतात?, असा कुठला नवीन कायदा आला आहे का?, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत कंपनी मालकाची बाजू घेतली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 

हेही वाचा- केंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल

त्यावर प्रश्नचिन्ही उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकारला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात निर्यातदार कंपन्यांना अडचणी येत असताना भाजप नेते अशा कंपन्यांकडून थेट रेमडेसिवीर हे अत्यंत महत्त्वाचं इंजेक्शन कसं काय खरेदी करू शकतं? असा कुठला नवीन कायदा आला आहे का त्याअंतर्गत भाजपन नेते हे इंजेक्शन सहजपणे खरेदी करू शकतात? एका साठेबाजाला चौकशीला बोलावून त्याची चौकशी करत पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे. एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये याचा अर्थ काय? असं म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भाजप नेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड दमणला जाऊन ब्रुक फार्मा कंपनीला भेट दिली होती. या भेटीनंतर ब्रुक फार्माकडून ५० हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन खरेदी करून ते भाजपच्या वतीने महाराष्ट्रात वाटण्यात येतील, अशी माहिती या दोन्ही नेत्यांनी दिली होती.  

(ncp leader jayant patil criticized devendra fadnavis and bjp over purchasing remdesivir injection for maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा