Advertisement

आम्ही फक्त 'त्या' व्यक्तीच्या बोलण्यालाच महत्त्व देतो, राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला

बाकीची लोकं काय बोलतात, त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचा हे मला काही योग्य वाटत नाही.

आम्ही फक्त 'त्या' व्यक्तीच्या बोलण्यालाच महत्त्व देतो, राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला
SHARES

आम्ही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel) यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना टोला हाणला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. नाना पटोले मागील काही दिवसांपासून स्वबळाची भाषा करत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची धुसफूस वाढली आहे. त्यावर भाष्य ककरताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा. मात्र महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. कोणी काही म्हणो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघआडीचं सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आहे. त्यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. शरद पवार हे महाविकासआघआडीचे मार्गदर्शक आहे व ते या पुढेही राहतील. म्हणून बाकीची लोकं काय बोलतात, त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचा हे मला काही योग्य वाटत नाही.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला सरकार का घाबरतंय, फडणवीसांचा सवाल

एच. के. पाटील हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे राज्यसभेतील नेते आहेत, ते मुंबईत येऊन गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. आम्ही कुणाच्या बोलण्यावर जावं? अशा प्रकारच्या नेहमीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत फार फरक पडत असेल, असं मला वाटत नाही. आता तो एक मीडिया इव्हेंट नक्कीच झालेला आहे. ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते करावं, आम्ही एखाद्या पक्षाला बांधून थोडीचं ठेवलं आहे, ही आघाडी आहे. याशिवाय ज्या पक्षाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही का उत्तर द्यावीत, असा प्रतिप्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी केला.

एच.के.पाटील हे प्रभारी आहेत, ते काय म्हणतात याला मी जास्त महत्व देतो. त्यामध्ये जास्त तथ्यं असतं कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघेही शरद पवार (sharad pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. याचा अर्थ काय? आता इशारा तुम्हाला माहीतच आहे, अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंचं नाव न घेताच टोला हाणला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा