Advertisement

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला सरकार का घाबरतंय, फडणवीसांचा सवाल

सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला का घाबरत आहे, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला सरकार का घाबरतंय, फडणवीसांचा सवाल
SHARES

महाविकास आघाडीकडे विधानसभेत स्पष्ट बहुमत असल्याचा दावा सातत्याने आघाडीतील नेत्यांकडून केला जातो. असंच असेल तर मग सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला का घाबरत आहे, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. मात्र दोन दिवसीय अधिवेशनात सरकारने या निवडणुकीला बगल दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

यावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना विचारलं असता, अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलण्याची बैठक ही नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत होऊ शकते. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. पण या सरकारकडे बहुमत आहे तर मग ही उठाठेव कशासाठी? सरकार घाबरतंय कशासाठी? यासंदर्भात जेव्हा विषय येईल तेव्हा आमची भूमिका सांगू,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- ‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच पृथ्वीराज चव्हाण यांची रित- भाजप

काही दिवसांपूर्वीच तालिका सभापती म्हणून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस भास्कर जाधव यांनी गाजवले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची गणितं बदलल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

भास्कर जाधव यांनी विधानसभेचं कामकाज सक्षमपणे चालवताना गोंधळ, धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून भाजपच्या १२ सदस्यांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करून भाजपला मोठा धक्का दिला. याच आक्रमकपणामुळे भास्कर जाधव यांचं नाव अचानकपणे विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं होतं.

जाधव यांनीही कोणत्याही तडजोडीशिवाय अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असेल तर ते स्वीकारण्यास मी तयार आहे, असं सांगितल्याने त्यात गोंधळाची भर पडली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद काँग्रेसकडेच (congress) राहील, ही भूमिका घेतल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा